नोकरीच्या नावावर १५.५० लाखांनी फसवणूक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकाची १५ लाख ५० हजार २८८ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. त्यांना बनावट ऑर्डरसुद्धा देण्यात आली. ही घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेमंतकुमार पाटील ऊर्फ संदीप देशमुख (रा. डोंबिवली, ठाणे) व शंभूराजे यशवंत देशमुख उर्फ सचिन पाटील रा. नवी मुंबई अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. शहरातील मार्डी मार्गावरील रहिवासी श्रीकांत फुलसावंदे (३५) यांची त्यांच्या परिचयातील संदीप रुखमना रा. कोल्हापूर यांनी हेमंत पाटील व शंभूराजे देशमुख या दोघांसोबत ओळख करून दिली होती. त्यावेळी हेमंत व शंभूराजे या दोघांनी श्रीकांत यांना तुमच्या कोणाला रेल्वे खात्यात डी व सी ग्रुपमध्ये नोकरीला लावायचे आहे का, अशी विचारणा केली. आमची रेल्वे खात्यात ओळख आहे, तुम्ही याचे पैसे द्या, आम्ही नोकरीवर लाऊन देऊ, असे आमिष त्यांनी श्रीकांत यांना दाखविले. श्रीकांत यांनी आपल्या दोन साळ्यांना नोकरीवर लावायचे आहे, असे म्हटल्यावरत्या दोघांनी त्यासाठी १६ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यांच्यात ठरलेल्या व्यवहारानंतर श्रीकांत यांनी हेमंत व शंभूराजे यांना शासकीय विश्रामभवनासमोर ४ लाख रुपये रोख दिले. त्यानंतर हेमंत व शंभूराजे या दोघांनी श्रीकांत यांच्याकडून विविध माध्यमातून एकूण १५ लाख ५० हजार २८८ रुपये घेऊन त्यांना नोकरीची ऑर्डर दिली. दरम्यान, ती ऑर्डर बनावट असल्याचे लक्षात आल्यावर श्रीकांत यांनी हेमंत व शंभूराजे यांना आपले पैसे परत मागितले. त्यावर त्या दोघांनी श्रीकांत यांना आम्हाला पैसे मागितले, तर तुला जिवाने मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे श्रीकांत यांनी फ्रेजरपुरा ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपींविरुद्ध फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013610
error: Content is protected !!