
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी शहरात अनेक नगरात, कॉलनीत रहिवाशी भागात,व्यापारी प्रतिष्ठान यांच्या आजूबाजूला मोठया प्रमाणात घाण झाली असुन सगळी कडे दुर्गंधी युक्त वातावरण निर्मिती झाली आहे तसेच शहरातील जीवन प्राधिकरण व पाणी पुरवठा नगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीत येत असल्याने शहरात दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने लहान मुलांन सहीत नागरीक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत परंतु नगर पालिकेचे आरोग्य अधिकारी व नगर पालिका दुर्लक्ष करीत असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक राजु गिरी यांनी सांगितले.तसेच शहानुर नदीचे पात्राची साफ सफाई न केल्याने नदी पात्रात घाण व झाड झुडपे वाढले आहे आता शहानुर धरणाचे दरवाजे चालु केल्याने नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने पात्रातील साप बाहेर निघत असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरीकांना साप चावण्याचे प्रमाण वाढले आहे राजु गिरी यांनी साप चावलेल्या एका रुग्णाला प्रकृती गंभीर असल्या कारणाने ग्रामीण रूग्णालयातुन अचलपुर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु अजुनही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील नगर पालिकेच्या अधिकारातील सुलभ शौचालयाची परिस्थीत अत्यंत गंभिर असुन योग्य साफ सफाई नसल्याने शौचालयाच्या आजू बाजूला परिसरात अत्यंत घाण दुर्गंध पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे शहरातील मोठ मोठ्या नाल्यांमध्ये दुर्गंधी युक्त पाणी साचल्याने डासांचा ही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे तसेच मार्केट मधिल बंधिस्त नाल्यांची चेंबर उघडुन त्याही नाल्या स्वच्छ करायचे राहले. परंतु अंजनगाव सुर्जी चे आरोग्य अधिकारी सहीत नगर पालिका या कडे दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक राजु गिरी यांनी आक्रमक पवित्रा घेत नगर पालिकेतील आरोग्य अधिकारी यांना खडेबोल सुनाउन नगर पालिकेत चांगलेच धारेवर धरले आहे आणि तात्काळ घाण स्वच्छ करून लहान मुलांन सहीत नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परीणामावर आळा घालावा तसेच स्वच्छ शहर सुंदर शहर नुसतेच भिंतीवर न लिहिता त्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवावा.तसेच शहरातील नागरिकांनी आपल्या परिवाराची काळजी घ्यावी व आपल्या घराजवळील जेवढा परिसर आपल्या कडून होते तेवढा परिसर स्वच्छ ठेवावे जेणे करून आपल्या परिवाराचे आरोग्य व्यवस्थित राहील असे आवाहन सुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांच्या कडून करण्यात आले.
या वेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख नितिन चौखंडे ,शहराध्यक्ष मुन्ना इसोकर, उपजिल्हा संघटक सुधाकर फुळंबरकर, तालुका संघटक राजु गिरी, शहर संघटक गौरव गायगोले, आकाश मोगरे सहीत शहरातील नागरीक उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






