खून का बदला खून; गुन्हेगाराची हत्या करून मृतदेह फेकला नालीत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती :केडियानगर स्थित उद्यानासमोर गैंगवॉरमधून झालेल्या खुनाच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा एकदा त्याच गँगवॉरमधून मृत यश रोडगे एका गुन्हेगार तरुणाचे अपहरण करून त्याची निघृण हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री १० च्या सुमारास सातुर्णा ते साईनगर रोडवरील चांडक नाष्टा सेंटर भागात तो खुनी थरार घडला. यश रोडगे (वय १८, रा. गोपालनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांना गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास यशचा मृतदेह भातकुली नाका परिसरातील कचरा डेपोच्या रोडच्या नालीत आढळला. घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी राजापेठ ठाण्यात धाव घेतली होती. वर्षभरापूर्वी लावा नामक तरुणाचा खून करण्यात आला होता. त्या खुनाचा बदला म्हणून यशची हत्या करण्यात आली. मृताचा मित्र तथा घटनेत जखमी झालेल्या आकाश रामटेके (वय २१, गोपालनगर) याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी श्री काटे, श्रेयस आवटे, तक्षदीप इंगळे, मंथन पाडनकर, दीपक ठाकूर व अन्य दोन-तीन जणांविरुद्ध गुरुवारी खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण वआर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंदविला.

 

यशच्या आईसह तरुण राजापेठेत लावाच्या खुनाच्या घटनेत 3 आपल्या मुलाचा कुठलाही सहभाग नव्हता, असे म्हणत यश रोडगेच्या आईसह त्याच्या समवयस्क मित्रांनी गुरुवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास राजापेठ पोलीस ठाणे गाठले. ते सीपींनादेखील भेटले.  डीसीपी गणेश शिंदे हे राजापेठेत तळ ठोकून होते. गुन्हे शाखा प्रमुख गोरखनाथ जाधव व सीआययूचे प्रमुख महेंद्र इंगळे यांनी देखील तपास चालविला आहे. याप्रकरणी, तक्षदिप इंगळे (२०, पार्वतीनगर), दिपक ठाकूर (२५, सातुर्णा). श्रेयस आवटे (१९, पुष्पक कॉलनी) व अरबाज खान (१८, म्हाडा) यांना अटक करण्यात आली. तर दोन अल्पवयिनांना ताब्यात घेण्यात आले.

गोपालनगर चौकात तरुणांची दहशत यश रोडगेचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती मिळताच त्याच्या काही मित्रांनी गुरुवारी सकाळी ८ ते च्या दरम्यान गोपालनगर भागात दुकाने बंद करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंची वाहने थांबवून त्या टोळक्याने भररस्त्यात दुचाकीस्वार तरुणांशी वादावादी केली. दुकाने बंद करो, हमारा यार गया है, असे म्हणत त्यांनी काही दुकाने बळजबरीने बंद केली. ते देखील पोलिसांच्या रडारवर आहत.

घटनेतील आरोपीविरुद्ध मोक्का यश रोडगे याच्या खूनप्रकरणातील आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम १११ नुसार संघटित गुन्हेगारीचा (जुना मोक्का कायदा) गुन्हादेखील नोंदविण्यात आला आहे. १ जुलैला बीएनएसची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर त्यातील कलम १११ नुसार नोंदविला गेलेला हा पहिला गुन्हा ठरला आहे. १८ जुलैला केडियानगर उद्यानासमोरील रोहित मांडळे खून प्रकरणातील आरोपीविरुद्ध देखील मूळ दाखल गुन्हयात संघटित गुन्हेगारीची कलम वाढ करण्याचे आदेशदेखील सीपींनी दिले आहेत. दरम्यान, आरोपींनी यश रोडगे याला मरणासन्न अवस्थेत म्हाडा कॉलनी येथील मृत लावाच्या घरी नेले होते.

असा घटनाक्रम समोर आला, पोलीस त्याची देखील खातरजमा करीत आहेत.

यश रोडगेच्या खुनाला वर्षभरापूर्वीच्या लावा मेश्राम खून प्रकरणाची किनार आहे. तूर्तास चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी जखमी यशला म्हाडा कॉलनीतील लावाच्या घरी घेऊन गेले की कसे, याबाबत तपास करीत आहोत. मृत यश रोडगेविरूध्ददेखील गंभीर गुन्हे दाखल होते.

– नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

 

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013606
error: Content is protected !!