दहेगाव खंड १ व २ येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

संजय लक्ष्मणराव कारवटकर
विदर्भ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
मु पो धानोरा ता राळेगाव
जिल्हा यवतमाळ
7499602440

 

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील खंड १ व २ येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आज दी 22 ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे दोन वाजता तहसीलदार राळेगाव यांना दिले सन २०२३ मध्ये झालेल्या ई-पिक पाहणी सर्व्हेमध्ये व गारपीट सर्व्हेमध्ये कापुस, सोयाबीन,तुर या पिकांना अनुदान मंजुर झाले. यामध्ये दहेगाव येथील जवळपास ५० टक्के शेतकरी सुटले आहे. तसेच सर्व्हेमध्ये गहु,चना,तुर या पिकाचा समावेश करण्यात यावा व सरसकट सर्व शेतकऱ्यांना अनुदानामध्ये सवाविष्ठ करण्यात यावे. तसेच गारपीटग्रस्त यादीमध्ये जवळपास ३०० शेतकऱ्यांपैकी फक्त ७९ शेतकऱ्यांचे यादीत नावे आहे.

त्यामुळे इतर शासकीय लाभापासुन वंचित असलेल्या व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित लाभ देण्यात यावा. व दहेगाव येथील तलाठ्याची तडकाफडकी बदली करण्यात यावी या मागणीचे निवेदन दहेगाव येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले.यावेळी पिंटूभाऊ दातारकर, दशरथ खैरे,मारुती डाहुले नारायण हरबडे,नरेंद्र धोबे,खुशाल काळे सुनील परचाके, पद्माकर जुमनाके, गजानन धनरे, प्रमोद उतारा, मगल कडमते यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!