
अमरावती : एका घरफोड्याला गुन्हे शाखेच्या युनिट एकने २३ ऑगस्ट रोजी अटक केली. त्याच्याकडून गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील एक गुन्हा उघडकीस आला आहे. प्रथमेश राजू हरदे (वय १८, रा. संतोषी नगर) असे अटक चोराचे नाव आहे.
पुंडलिकबाबा नगर येथील रतिका प्रतीक उडाखे या १६ ऑगस्ट रोजी कराड येथे गेल्या होत्या. या काळात त्यांचे घर फोडून ११,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.
या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे युनिट एक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात या गुन्ह्यात प्रथमेशचा हात असल्याचे समोर आल्यावर चौकशीत त्याने तो गुन्हा एका विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत केल्याची कबुली दिली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, सतीश देशमुख, विकास गुडदे यांनी केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






