दोन हजार कुत्र्यांचे होणार निर्बीजीकरण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : शहरात अलीकडे मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, त्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण राखण्यासाठी शहरातील दोन हजार मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे ३२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या मोहिमेसाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ बोलावले आहेत. अर्थात इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागितले आहेत. आगामी पशुगणनेनंतर शहरातील मोकाट श्वानांची संख्या निश्चित होणार आहे. अॅनिमल बर्थ कंट्रोल रुल २००१ नुसार, अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणे, अँटीरेबीज लसीकरण, पोषण, व्यवस्थापन, शस्त्रक्रियेनंतर औषधोपचार, सुरक्षा वेदनारहित मृत्यू व आवश्यक औषधी व संपूर्ण व्यवस्थेसह मनुष्यबळासाठी पशुवैद्यकीय विभागाने इच्छुकांकडून प्रस्ताव मागितले आहेत.

गतवर्षीही दोन हजार मोकाट कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र एक मादी श्वान वर्षभरात १६ पिलांना जन्म देत असल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या भरमसाट वाढली आहे. दुसरीकडे, वर्षाकाठी २० ते २५ हजार मोकाट कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया अपेक्षित असताना आर्थिक नादारीमुळे महापालिकेला मर्यादा आल्या आहेत. रस्त्यांवरून सैरावैरा धावणाऱ्या कुत्र्यांमुळे वाहनचालकांनादेखील अत्यंत काळजीपूर्वक वाहन चालविण्याची वेळ आली आहे.

 

सन २०१७ नंतर २०२३ मध्ये निर्बीजीकरण मे २०१६ ते जुलै २०१७ यादरम्यान१०,८७० श्वानांची नसबंदी करण्यात आली होती. नंतर सन २०२३ मध्ये दोन हजारांवर अधिक मोकाट व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले. मात्र वाढत्या जन्मदरामुळे शहरातील विविध परिसरांत भटकी कुत्री दिसतात.

हा भाग धोक्याचा यशोदानगर ते दस्तूरनगरसह अनेक रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांमुळे वाहन चालवणे कठीण होत आहे. शारदानगर, राजापेठ, जुना बायपास चवरेनगर, लालखडी, शंकरनगर, मंगलधाम कॉलनी, दसरा मैदान झोपडपट्टी भागासह जेथे मांसविक्री केली जाते तो परिसर धोक्याचा आहे.

चार महिन्यांत ६,३४८ जणांना श्वानदंश यंदाच्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत जिल्ह्यातील एकूणच शासकीय रुग्णालयात श्वानदंशाचे ६३४८ रुग्ण आलेत. पैकी २ हजार ६५८ रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले.

तक्रारीप्रमाणे मोकाट श्वानांना पकडले जाते. त्यासाठी पथक कार्यरत आहे. २३ ऑगस्ट रोजी दोन हजार श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी ‘ईओआय’ मागितले आहेत.

– डॉ. सचिन बोंदे 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!