कुख्यात यश कडू वर्षभरासाठी तुरुंगात !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : सन २०१८ पासून गुन्हेगारीत शिरकाव केलेल्या व पोलिस दप्तरी कुख्यात म्हणून नोंद असलेल्या यश सुनील कडू (२४, रा. मेहरबाबा कॉलनी, जेवड नगर) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ अन्वये कारवाई करून त्याला वर्षभरासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. राजापेठ ठाण्याच्या हद्दीत महिनाभराच्या अंतराने झालेल्या दोन खुनांच्या पार्श्वभूमीवर यश कडूला वर्षभरासाठी तुरुंगात धाडण्यात आले. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी २३ ऑगस्ट रोजी ते आदेश काढले.

तीन दिवसांपूर्वी यश रोडगे (१८, गोपालनगर) याचे अपहरण करून टोळीयुद्धातून खून करण्यात आला. त्यानुषंगाने अवघ्या एका दिवसात यश कडू विरुद्ध एमपीडीए करण्यात आला. यश कडूविरुद्ध राजापेठ, फ्रेजरपुरा, कोतवाली ठाण्यात घातक हत्यारांनी जबर दुखापत, हाफमर्डर, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे, गृह अतिक्रमण, मृत्यू किंवा जबर दुखापतीच्या प्रयत्नासहित जबरी चोरी किंवा दरोडा, अॅट्रॉसिटी, अग्निशस्त्र व अवैध शस्त्र बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन असे गंभीर स्वरूपाचे एकूण१६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधक व तडीपार कारवाई करण्यात आली. तरी सुद्धा तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असल्याने त्याच्याविरुद्ध राजापेठचे ठाणेदार महेंद्र आंभोरे यांनी आयुक्तालयात एमडीपीएचा प्रस्ताव पाठविला. गुन्हे शाखेचे निरीक्षक गोरखनाथ जाधव व एमपीडीए सेलमार्फत त्या प्रस्तावाची पूर्तता करण्यात आली.

 

राजापेठ पोलिस होते लक्ष ठेवून गेल्या काही दिवसांपासून आरोपी यश कडू हा राजापेठ पोलिसांच्या रडारवर होता. तो जेलमधून बाहेर पडताच त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. तो एका स्थानिक गैंगशी कनेक्ट असून, कुख्यात गुन्हेगार असल्याने यश रोडगे हत्याप्रकरणानंतर आणखी कुठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अप्रिय घटना होऊ नये, यासाठी तातडीने अवघ्या एका दिवसात त्याच्याविरुद्धच्या एमपीडीए प्रस्तावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन त्याला गुन्हेगारी कारवायांपासून रोखण्यासाठी तुरुंगात धाडण्यात आले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!