
कोकर्डा : सुमारे १२ हजार लोकसंख्येचे बाजारपेठेचे गाव असलेल्या कोकर्डा येथील गावालगतच्या नाल्याने डोकेदुखी वाढविली आहे. सततच्या पावसामुळे नाल्यातील पाणी वाढल्यास गावाबाहेर पडायला मार्गच नाही. वर्षानुवर्षे ही समस्या कायम आहे. त्याविरोधात ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा हे आजूबाजूच्या दहा किलोमीटर परिघातील १५ ते २० खेड्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. शुक्रवारी येथे मोठा भाजीपाला बाजार भरतो. दवाखाना, शिक्षण, औषध, जीवनावश्यक वस्तू अशा सर्व गोष्टींसाठी कोकर्डा गाठावे लागते. येथे येत असताना कोकर्ड फाट्यावरून तीन नाले लागतात. दोन नाल्यांवर साधारण पूल आहेत. परंतु, गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूल अगदी नसल्यासारखा आहे. फार पूर्वी या. नाल्यावर छोटा पूल बांधण्यात आला होता, मात्र पाऊस येताच त्यावरून अनेक फूट पाणी वाहते.
दोन-तीन तास वा पूर्ण दिवसभराकरिता संपूर्ण वाहतूक बंद राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालय, तर रुग्णांना बाहेरगावी हलविण्यास मोठी अडचण निर्माण होते. ही परिस्थिती १५ ते २० वर्षांपासून आहे.
आंदोलनाचा इशाराकोकर्डा येथील नाल्यावरील पुलाची समस्या निकाली न निघाल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दिला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






