श्रीनाथ विद्यालय येथे सखी सावित्री समितीची स्थापना; सक्षमीकरण, सामाजिक शिक्षण व अन्यायाविरुद्ध मार्गदर्शन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
श्रीनाथ विद्यालय, सुर्जी अंजनगाव येथे सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या स्थापनेचा उद्देश महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना सामाजिक व अन्यायाविरुद्ध लढा देणे हा आहे. समाजातील सद्याचे विद्यार्थी, बदलते वातावरण पाहता विद्यार्थ्यांना जगत असताना काही गोष्टींची माहिती असणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामध्ये आरोग्यविषयक, कायदेविषयक तथा पोलिसी कारवाई ची माहिती असावी यासाठीच सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली आहे. या स्थापणेप्रसंगी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. वैशालीताई कडू व डॉ. उज्वलाताई टांक, पोलिस कॉन्स्टेबल कु. दिपाली तेलगोटे तसेच वकील रसिकाताई देशपांडे यांची उपस्थिती लक्षणीय होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांसाठी गुड टच आणि बॅट टच याबद्दल सविस्तर डेमो देऊन माहिती सांगितली तसेचमहत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना समाजातील विविध विषयांबद्दल जागरूक करणे आणि त्यांचे सर्वांगीण विकास साधणे हे होते.
कार्यक्रमात पोलिसांनी सुरक्षा आणि कायद्याबद्दल माहिती दिली, डॉक्टरांनी आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यावर चर्चा केली, तर वकिलांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन दिले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विविध विषयांवर सखोल ज्ञान मिळवले. सखी सावित्री समिती हा अभिनव उपक्रम असून विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे मान्यवरांनी याप्रसंगी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावरकर मॅडम यांनी केले व कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडला त्याबद्दल मुख्याध्यापिका सौ. चौधरकर मॅडम यांनी सर्व शिक्षक कर्मचारी यांचे आभार मानले तसेच वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!