
अमरावती : कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आईचा मृत्यू झाला, तर मुलगा जखमी झाला. हा अपघात २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एसआरपीएफ कॅम्प परिसरात घडला. शमीम बानो अब्दुल मतीन (५०) असे मृताचे, तर अब्दुल सोहेल अब्दुल मतीन (२४) असे जखमीचे नाव आहे.
फ्रेजरपुरा पोलिसांनुसार, चांदूर रेल्वे येथील रहिवासी अब्दुल सोहेल हा आई शमीम बानो यांच्यासह मंगळवारी दुपारी दुचाकीने अमरावतीला येत होता. मार्गात एसआरपीएफ कॅम्प परिसरातील वळणावरील नाल्याजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या कारने (क्रमांक एमएच २७-एएच ७९४२) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात शमीम बानो यांचा मृत्यू झाला. तर अब्दुल सोहेल हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जखमी अब्दुल सोहेल याला उपचारार्थ इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी मो. अनीस अब्दुल अजीज (रा. अमरावती) यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






