जिल्हा परिषदेचे स्वच्छ माझे अंगण अभियान
अमरावती
: राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील गाव स्तरावरील सर्व कुटुंब स्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापण ,सांडपाणी व्यवस्थापण या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय अंगीकृत करण्यासाठी व या मधुन लोकचळवळ उभी करण्याच्या उद्देशाने गाव स्तरावर दिनांक १ सप्टेंबर ते २ आक्टोबर २०२४ या कालावधीत स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यात ज्या कुटुंबानी वौयक्तीक शौचालय ,सांडपाणी व्यवस्थापणा करिता शोषखड्डा, परसबाग, पाझर खड्डा, घनकचरा व्यवस्थापणा करिता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा आणी कुटुंब स्तरावर कचराकुंड्या या बाबतची उपलब्धता करून घेतली असून त्यांचा नियमितपणे वापर करतात अशा कुटुंबाना प्रोत्साहन देत इतरही कुटुंबांणी त्यांचे अनुकरण करण्याच्या उद्देशाने अभियान राबविण्यात येत आहे.वौयक्तीक शौचालयाचा नियमित वापर दैनंदिन स्वच्छता, शाश्वत स्वरूपात सर्व कुटुंब सदस्यांकडून वापर आणी ही सुविधा निरंतर टिकावी म्हणून आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कुटुंबाने पुढाकार घेणे. घरगुती स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करणे, कुटुंब स्तरावर सुका कचरा ओला कचरा कुंड्यांमध्ये वर्गीकरण करणे, वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खतखड्डा किंवा घरगुती खतखड्डा निर्मिती करून कचऱ्याचे,घर किंवा घराच्या परिसरात व्यवस्थापण करणे, परस बाग, पाझर खड्डा, शोष खड्डा या द्वारे घरगुती स्तरावर सांडपाणी व्यवस्थापण करणे या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.
अभीयानातील निकषांची पूर्तता करणाऱ्या कुटुंबांची ग्रामपंचायती मधील पाणी व स्वच्छता समिति मार्फत पडताळणी करण्यात येऊन निवड केलेल्या कुटुंबांच ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे व दिनांक 2 ऑक्टोंबर रोजीच्या ग्रामसभेत सरपंच ग्रामसेवक यांचे संयुक्त स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केल्या जाणार आहे. तरी अभीयानामधे गावपातळीवरील सर्व कुटुंबानी व्यापक स्वरूपात सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र,पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी केले आहे.
कुटुंब निवडीचे निकष
संबंधित कुटुंबाकडे घरात किंवा परीसरात खालील बाबीं असणे आवश्यक आहे.
१) घरगुती खतखड्डा / परसबाग
२) वैयक्तिक शोषखड्डा /पाझरखड्डा
३) वैयक्तिक शौचालय
४) घरगुती कचराकुंड्या
हे आहेत अभीयान कालावधी चे टप्पे
अभीयान कालावधी – ०१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर
पडताळणी कालावधी – २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर
पात्र कुटुंबाना लेखी स्वरूपात निमंत्रण – १ आक्टोबर
प्रशस्तीपत्र वितरण – २ आक्टोबर
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 54






