भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती  :  जातीनिहाय जनगणना करा, आरक्षणाची ५०% मर्यादा उठविण्यासाठी संसदेत कायदा करा व जनतेच्या मुलभूत प्रश्नाची सोडवणूक करा , व इतर स्थानिक मागण्यांना घेवून आज ३० ऑगस्ट रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती . या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी , मजुर ,कामगार , विद्यार्थी ,युवक , महिलांचा विशाल मोर्चा काढण्यात आला . डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक ( इर्विन ) येथून पक्षाचे राष्ट्रीप कौंसिल सदस्य व जेष्ठ नेते कॉ. तुकाराम भस्मे , पक्षाचे जिल्हा सचिव कॉ सुनिल मेटकर , पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य कॉ . अशोक सोनारकर आयटकचे जिल्हा अध्यक्ष कॉ. जे .एम . कोठारी , बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्य सचिव कॉ संजय मंडवधरे यांचे नेतृत्वात डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला अभिवादन करून मोर्चाला सुरवात झाली.

केंद्र व राज्यातील भाजप सरकार जातीनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ करीत आहे. सर्व वंचित जात समुहांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात शिक्षण , नोकरी , व देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात योग्य स्थान देण्या करिता देशभरातून जातीनिहाय जनगणनेची मागणी होत . सर्व कष्टकरी समुहाचे प्रश्न तिव्र झाले आहे मात्र केंद्र व राज्य सरकार मुस्लीम व्देषाचा अजेंडा राबवून भारतीय समाजामध्ये धार्मिक फुट पाडण्याचे काम करीत असल्याचे मत पक्षाचे पक्षाचे नेते कॉ तुकाराम भस्मे यांनी मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केले . मोर्चाला पक्षाचे जिल्हा सचिव कॉ . सुनिल मेटकर , ग्रा. पं . कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव कॉ . निळकंठ ढोके , महिला फेडरेशनच्या ॲड. क्रांती देशमुख , कॉ चित्रा वंजारी , किसान सभेचे कॉ . सतिश चौधरी , प्रा अरविंद वानखडे , अंगणवाडी युनियनच्या कॉ .मिरा कैथवास , बांधकाम कामगार संघटनेचे कॉ . संजय मंडवधरे .आशा वर्कर संघटनेचे कॉ .प्रफुल देशमुख , एआयएसएफ च्या जिल्हा सचिव कॉ . प्रतिक्षा ढोके , उमेश बनसोड यांनी मोर्चाला संबोधित केले.

मोर्चामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेतकरी ,मजुर ,कामगार , महिला , विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . जातीनिहाय जनगणना करा . स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून सर्व पिकांसाठी हमीभावाचा कायदा करा . सर्व कष्टकरी कामगार शेतकरी मजुरांसाठी पेंशनचा कायदा करा . घरकुलासाठी ५ लाख रुपये अनुदान द्या . स्मार्ट मिटर योजना रद्द करा . अमरावती जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या . कापूसला १० हजार ,सोयाबीनला ७ हजार भाव देवून सरकारी खरेदी केंद्र सुरु करा . महिलावरील वाढत्या लैंगिक अत्याचाराला आळा घाला व आरोपींना फाशीची शिक्षा दया . अंगणवाडी ,आशा , ग्रामपंचायत कर्मचारी ,शालेय पोषण आहार कर्मचारी , घरकामगार मोलकरीण ,बांधकाम कामगार यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढा.

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा .शेती कुंपणासाठी अनुदान द्या .धन्या ऐवजी पैसे योजना रद्द करा , सर्वांना अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत रेशन द्या .मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करा व शेती कामाचा समावेश मनरेगा मध्ये करा .शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा व शेतीपंपाचे थकित वीज बिल माफ करा .वनाधिकार कायद्याअंतर्गत आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जमिनीचे वाटप करा .आरोग्यवस्थेचे खाजगीकरण रद्द करा .आरोग्यवस्थेतील रिक्त पदाची त्वरित भरती करा . नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भरा स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार व भ्रष्टाचार बंद करा . सर्व योजना कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या व सामाजिक सुरक्षा लागू करा.

किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करा .सार्वजनिक उद्योग व सरकारी उद्योगातील रिक्त जागा त्वरित भरा . बेरोजगारीला आळा घाला . बांधकाम कामगारांच्या नोंदणीतील अडचणी दूर करा . सन २३ – २४ करिता पिक विमा नुकसान भरपाई द्या व पिक विमा क्षेत्रातून खाजगी कंपन्या हद्दपार करून सरकारी पिक विमा कंपनीची स्थापना करा . सोयाबीन कापूस अनुदान वाटप योजनेतील ई पिक पाहणीची अट रद्द करा . इत्यादी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत ना . एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले . मोर्चामध्ये सागर दुर्योधन , डॉ . ओमप्रकाश कुटेमाटे , चंद्रकांत बानुबाकोडे, विनोद जोशी , चंद्रकात वडस्कर, प्रा .विजय रोडगे , लताताई सोनारकर , सुनिल घटाळे , कैलाश ठाकरे , धनंजय मस्के, एम .वाय . शहाणे , ज्ञानेश्वर मेश्राम , जयेंद्र भोगे , बापुराव बाळापुरे, संतोष सुरजुसे, संजय हाडके , अर्चना भांडवलकर , इंदूताई बोके , लक्ष्मणराव धाकडे , प्रकाश सोनोने , कैलाश महाजन , शरद मंगळे,संजय मंगळे , महेश जाधव ,रेखा मोहोड , विश्वास कांबळे, विनोद तरेकर नारायण भगवे ओमप्रकाश सावळे , प्रज्ञा बनसोड , रेखा हिंगवे , वैशाली निस्वादे सलीम खाँ , कैलाश महाजन , शरद मंगळे ,राजाभाऊ बाभूळकर , राहूल मंगळे , प्रकाश कुरेकर , शाहीर धम्मा खडसे , बाबाराव दाहिजे ,नंदू नेतनराव , प्रज्वल ढोके सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!