

संजय लक्ष्मणराव कारवटकर
विदर्भ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
मु पो धानोरा ता राळेगाव
जिल्हा यवतमाळ
7499602440

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर तलाठी संतोष पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ राळेगाव तलाठ्यांचे एक दिवसीय कामबंद आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे
मौजे आडगांव रंजे, ता. वसमत, जि. हिंगोली येथील तलाठी संतोष पवार यांची कार्यालयात घुसून भरदिवसा निघृण हत्या करण्यात आली असून या हत्येच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघ नागपूर च्या वतीने राळेगाव तालुक्यातील तलाठी यांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन करून तलाठी पवार यांच्या हत्येचा तिव्र शब्दात निषेध करत दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून मृतक व त्यांचे कुटुंबियांस न्याय मिळवून द्यावा तसेच तलाठी/मंडळ अधिकारी यांचे संरक्षणार्थ शासन प्रशासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी पटवारी संघांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शासकीय कर्तव्ये बजावताना तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर होणारे जिवघेणे हल्ले ही नित्याचीच बाब झाली आहे. अवैध गौण खनिज ऊत्खणन व वाहतूक यासाठी मुख्यतः तलाठी व मंडळ अधिकारी हे संघटीत गुन्हेगारीतून अवैध गौण खनिज ऊत्खणनात सहभागी टोळयांच्या रोषास बळी पडत असून त्यावर संघटनांनी वारंवार मागणी करुनही शासनाने अद्यापही कोणतीही उपाययोजना केली नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







