

संजय लक्ष्मणराव कारवटकर
विदर्भ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
मु पो धानोरा ता राळेगाव
जिल्हा यवतमाळ
7499602440
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर मध्यम प्रकल्प अनेक वर्षापासून झाला असून या प्रकल्पाच्या भिंतीला लागून असलेल्या भागात खूप मोठी मोठी झाडेझुडपे वाढली असून त्या परिसरातील शेती करत असलेल्या शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांनी भंडावून सोडले असून या भिंतीवर मोठमोठे झाडेझुडपे वाढली आहे सोबतच कालव्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा खूप खूप जंगलांचे स्वरूप आले आहे. अशातच या परिसरात वाघोबांनी आपला मोर्चा वळवला असून आतापर्यंत बुकई शिवारात निवासी असलेल्या या वाघाने परत आपला मोर्चा तलावाच्या परिसरात वळवला असून झरगड आणि वरूड जहांगीर येथील परिसरात शेतकऱ्यांना निदर्शनास आला असून या घनदाट कालव्याच्या आधाराने आसरा घेतला असल्याने कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.करीता सध्याची परिस्थिती पाहता आणि या वाघाची वावर पाहता मध्यम प्रकल्प विभागाने ताबडतोब भिंतीचा आणि कालव्याच्या दोन्ही बाजूची ताबडतोब स्वच्छता करण्याची मागणी शेतकरी पुत्र राहुल वडते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






