शासकीय तांदळाला फुटले पाय, कारवाई केव्हा ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : तहसीलदार, अन्न व नागरी पुरवठा विभाग, महसूल अधिकाऱ्यांनी रेशन धान्याची तस्करी रोखण्यासाठी कार्यवाही करावी. कारण तांदूळ तस्करांची वाहने बिनधास्तपणे महामार्गावर फिरताना दिसून येतात, अशी मागणी होत आहे.

शासकीय धान्याचा काळाबाजार अनेक दिवसांपासून सुरू आहे. काहीजण किराणा व्यावसायिकांना तसेच छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना धान्य विक्री करतात. हे व्यापारी गोडाऊनमध्ये धान्य जमा करून गोंदिया, भंडारा जिल्ह्यात मोठ्या व्यापाऱ्यांना विकत असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात गहू व तांदूळ रोजच्या जेवणातील घटक नाहीत. ज्वारीची भाकरी हा आहाराचा भाग आहे. त्यामुळे स्वस्त धान्य मार्फत मिळणारा प्रती माणसी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ हा काही कुटुंबात अतिरिक्त ठरतो आहे. टोळ्या आता गावोगावी जाऊन गहू ८ ते १०, तर तांदूळ १५ ते २० रुपये प्रतिकिलोने खरेदी करत आहेत. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणात अद्याप कुठल्याही व्यापाऱ्यांवर व दुकानदारावर कारवाई न झाल्याने धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!