बोलली नाहीस, तर फोटो शाळेत दाखवेन!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : माझ्यासोबत बोलली नाहीस, तर तुझे-माझे फोटो शाळेत दाखवेन, अशी धमकी देत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय चौधरी (२२, रा., ता.नांदगाव खंडेश्वर) याच्याविरुद्ध विनयभंग व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला.

गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली टारगटांचे टार्गेट ठरल्या आहेत. फिर्यादी ही बारावीची विद्यार्थिनी असून, ती शुक्रवारी कनिष्ठ महाविद्यालयात जात असताना आरोपी तिच्या मागे आला. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे म्हणून त्याने तिला थांबविले. त्यावर तिने बोलण्यास नकार दिला असता, मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्यासोबत बोल, माझ्यासोबत बोलली नाहीस तर तुझे माझ्यासोबत असलेले फोटो शाळेत व गावात दाखवून बदनामी करेन, तथा स्वतःच्या जिवाचे काही बरे-वाईट करेन, अशी धमकी तिला दिली. त्यानंतरही त्याने तिचा पाठलाग केला. त्यामुळे तिने सायंकाळच्या सुमारास मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!