
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचा दिनांक 4 तारखेला राळेगाव दौरा होता, या राळेगाव दौऱ्यामध्ये राळेगाव तालुक्यातील काही गावातील ग्रामपंचायतला भेटी दिल्या, राळेगाव तालुक्यातील धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी धावती भेट दिली ,धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्यांनी पाहणी केली, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बांधकाम चालू असल्याने त्याची सुद्धा पाहणी केली व काम बंद असल्यामुळे त्यांना त्यांचा पाठपुरावा करू असे सांगितले, प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण पाहणी करून डॉक्टरांना काही उपदेश करण्यात आले, यावेळी राळेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव पवार व जिल्हा परिषद चे कार्यकारी अभियंता चंदनखेडे, धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाटील,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, धानोरा ग्रामपंचायतचे सदस्य तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे पूर्ण कर्मचारी हजर होते यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






