
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर राळेगाव तालुक्यातील अंतरगाव जागजई हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे या रस्त्याने मोठ मोठे खड्डे सुद्धा पडलेले असून त्याकडे मात्र लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष केले जात आहे, निवडणूक आली की आम्हाला मतदान द्या, आम्हाला मतदान द्या हे फक्त लोकप्रतिनिधींनी दिसतात परंतु जनतेला जाण्या येण्यासाठी रस्ता कसा आहे, जनतेची काय हाल होत असेल, जनता कशी काय जात असेल, पावसाळ्यात जनतेला काय यातना भोगावे लागत असेल, हे मात्र या लोकांना काहीही समजत नाही ,हाच का विकास,अंतरगावची शाळा बेघर वस्तीत असून त्या बेगर वस्तीत मुलांना खड्डे पडलेल्या रस्त्याने जावे लागत असून जर एखादा मुलगा पावसाळ्याच्या खड्ड्यात पडलं तर त्याला जबाबदार कोण? या रोड कडे लोकप्रतिनिधी लक्ष केव्हा देणार आता काही दिवसात विधानसभा निवडणुका येणार असून या निवडणुकीकडे आम्ही अंतरगाव वाशी दुर्लक्ष करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे व उंद्री ,जागजई येथील नागरीकांनी सुद्धा आम्ही यावेळेस मतदान करणार नाही असे सांगितले आहे हे मात्र विशेष
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






