

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर
यवतमाळ विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकरबिगर सातबारा शेतकरी संघटनाय यांनी दिनांक 19 सप्टेंबर रोजी जनसंपर्क कार्यालयासमोर करणार डफडे बजाव आंदोलनं संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हापोलिस अधीक्षक कार्यालयात केलें निवेदन सादर
नागपूर – दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना म्हणजे बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि त्या संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करुन शेतीची अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासाठी धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करावा अन्यथा राज्यभर आंदोलनं करण्यात येइल असे निवेदन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडे सादर केले होते त्यानुसार प्रधानमंत्री कार्यालयाकडे निवेदन पाठवून त्याची प्रत माहिती करिता संघटनेला मिळणे अपेक्षित होतें त्याची माहिती घेण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी मा नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेले असता तेथील कर्मचाऱ्याने उडवा उडवी चे उतरे देऊन दलीत आदिवासी समाजाच्या लोकांच्या निवेदनाची थट्टा उडविली असल्याचा आरोप बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी जील्हापोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल केलेल्या निवेदनातून केला आहे
* जनसंपर्क कार्यालयातील कर्मचारी पैकी सुधिर नामक कर्मचाऱ्याने सांगीतले की तुमचे निवेदन जिल्हाअधिकारी यांच्या कडे पाठविले, त्याची प्रत मागितली असता तुमचे निवेदन दिल्ली येथे पाठविले आहे त्याची सुद्धा आम्हाला प्रत द्या अशी मागणी केली असता तुम्ही आता निघून जा अशा निवेदनावर आम्ही पत्र देत नसतो असे सांगून दलीत आदिवासी समाजाच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली काय असा प्रश्न उपस्थीत केल्यामुळे संतप्त झालेल्या बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हापोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून दिनांक 19 सप्टेंबर रोजी जनसंपर्क कार्यालयावर डफडे बजाव आंदोलनं करण्याचं इशारा दिला यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
* नितीन गडकरी हे स्पष्ट वक्ता असुन सत्य बाजूने निर्भिड पने आपले मत मांडत असतात जनतेला स्पष्ट भाषेत तोंडावर उत्तर देतात त्यांची ओळख प्रमाणिक राजकारणी म्हणून देशभर असताना केवळ दलीत आदिवासी समाजाच्या लोकांच्या निवेदनाला केराची टोपली का दाखविली याचा जाब विचारण्यासाठी दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने डफडे बजाव आंदोलनात सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे
भाई जगदीश कुमार इंगळे संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







