
अमरावती: अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन 2022-23 चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जरुड ग्रामपंचायतने राज्यात दुसऱ्या क्रमांक तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आणि झटामझिरी ग्रामपंचायतने दुसरा तर अंबाडा ग्रामपंचायतने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते या ग्रामपंचायतींना धनादेश, सन्मानचिन्ह देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
अटल भूजल योजनेअंतर्गत सन 2022-23 या वर्षात भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये जरुड ग्रामपंचायतने राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे 50 लाख रुपयांचे बक्षिस प्राप्त केले तसेच जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करुन जिल्ह्याचे 50 लाख रुपये असे एकत्रितरित्या एक कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त केले. तसेच वरुड तालुक्यातील झटामझिरी ग्रामपंचायतने दुसरा क्रमांक प्राप्त करुन 30 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला तर मोर्शी तालुक्यातील अंबाडा ग्रामपंचायतने तिसऱ्या क्रमांकाचे 20 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला.
दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक (मित्रा) मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त पवनीत कौर याच्या हस्ते या ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







