बाजाराहून परतताना ऑटोरिक्षा चंद्रभागेत कोसळली; वृद्ध ठार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

दर्यापूर : खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील रामगाव-कोळंबी येथील चंद्रभागा नदीच्या पुलावरून प्रवासी ऑटोरिक्षा पुलावरून नदीत कोसळून ८० वर्षीय वृद्ध ठार, तर ११ जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.

दर्यापूर येथील आठवडी बाजार असल्याने कोळंबी येथील नागरिक गुरुवारी बाजार करण्यासाठी गेले होते. एमएच २७ एआर ३९५७ क्रमांकाच्या ऑटोरिक्षाने ते गावाकडे जात होते. यादरम्यान रामगावहून कोळंबीकडे जात असताना पुलाच्या उंच भागावरून प्रवासी ऑटोरिक्षा मागे घसरली व थेट चंद्रभागा नदीपात्रात कोसळली. या घटनेत वयोवृद्ध सुखदेव भिकाजी इंगळे (८०) यांच्या डोक्याला, छातीला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मत्य झाला ऑटोरिक्षाचालक सनील काकडे व प्रवासी राजेंद्र ढाकरे, मधुकर भटकर, महादेवराव काकडे, करुणा तायडे, गयाबाई तायडे, बयनाबाई रॉधे, वच्छला नांदणे, सुनीता भालेराव, शोभा भटकर, मंगला घाटे हे जखमी झाले आहेत.

अपघातातील सर्व जखमीना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे हलविण्यात आले. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच ऑटोरिक्षा ताब्यात घेण्यात आला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!