
अचलपूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई-पीकमध्ये ९३ टक्के सरासरी गाठली. महसूल प्रशासनाच्या निरंतर प्रयत्नाचे हे फळ आहे.
शेतकऱ्यांना शासनापासून विविध योजनेचा लाभ मिळावा तसेच नुकसानभरपाई मिळविण्याकरिता ई- पीक पाहणी आवश्यक आहे. तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शासकीय योजनेचा लाभ मिळावा, त्याला नुकसानभरपाई मिळावी, याकरिता महसूल प्रशासनाने विविध स्तरांवर प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना मोठ्या संख्येने यश मिळाले असून जवळपास ९३ टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेताची पीक पाहणी केली आहे.
अचलपूर तालुक्यात एकूण ४३ हजार २४१ कृषिखाते आहेत. मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३० हजार ७२६ आहे. एवढी संख्या मोबाईल अॅपद्वारे व तलाठी स्तरावरील पीक पाहणी खात्यांची आहे. तालुक्यात कृषिखात्यांवरील एकूण क्षेत्र ६४ हजार ६९९ हेक्टर आहे. मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी केलेल्या खात्यांचे एकूण क्षेत्र ५९ हजार ३२६ हेक्टर आर आहे. मोबाईल अॅपद्वारे व तलाठी स्तरावरील पीक पाहणी केलेल्या खात्याची एकूण टक्केवारी ९१ टक्के आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ६३ हजार २३३ आहे. असे एकूण मिळून सर्वसाधारण पेरणी क्षेत्र संपूर्ण वर्ष क्षेत्र आणि पीक पाहणी झालेल्या एकूण क्षेत्राची टक्केवारी अचलपूर तालुक्यात ९३ टक्के झालेली आहे.
अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ई-पीक पाहणी केली आहे. अनेक शासकीय योजनेचा लाभ ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळतो. शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ ही पीक पाहणी व नोंदणी करावी. त्याकरिता महसूल विभाग त्यांना सहकार्य करेल.
– डॉ. संजय गरकल, तहसीलदार, अचलपूर
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







