परसापूर उपकेंद्रावरून सिंगल फेज वीजपुरवठा बंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

पथ्रोट : मागील काही दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीचे कारण देत परसापूर परिसरातील शेतशिवारात विशेषतः पाचआंबा बुद्रुक परिसरातील सिंगल फेज वीजपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे केबलचोरांचे फावले असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

आधीच भारनियमन असल्यामुळे रात्री-अपरात्री शेतकरी अंधारात शेतात जातो. शेतातील चोरीचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी केबल चोरण्याचे प्रकार शेतकऱ्यांच्या शेतात झाले. अंधाराचा फायदा घेऊन चोर खोपडीचे कुलूप तोडून सामानाची चोरी करीत आहेत. हा हैदोस नेहमी चालू असतो. याशिवाय रात्रीला शेतात जाणारा शेतकरी, शेतमजूर यांना साप, विंचू तथा इतर हिंस्त्र पशुंचा धोका असतो.

रात्रभर एक बल्ब जरी जळत असला तरी सोकारी शेतात राहण्यास तयार होतात. मात्र, मागील पाच ते सहा महिन्यांपासून वीजपुरवठा बंद नसल्याने शेतकऱ्यांनाच जागली करावी लागत आहे. महावितरणने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पाचआंबा बुद्धक परिसरातील शेतकरी करत आहेत.

हळूहळू एकेक शिवारातील सिंगल फेज फीडर बंद पडत गेल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. परंतु, ते चार्ज होत नसल्याने पुन्हा बंद पडले. ते आजपर्यंत सुरू झालेच नाहीत, अशी माहिती महावितरणकडून मिळाली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!