

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर
हाच का जनतेचा विकास, यालाच विकास मणायचा का❓मोदापूर व पारडी येथील जनतेचा प्रश्न❓
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकररा ळेगाव तालुक्यातील मुधापुर ते पारडी या पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून हा रस्ता सतत होणार्या पावसामुळे चिखलमय झाला आहे.या रस्त्यावर असलेल्या मुधापुर येथील शेतकर्यांना वाहन नेणे दूरच यावरुन पायदळ देखील चालणे कठीण झाले आहे. आपल्या शेतात जाण्यासाठी शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागते. मुधापुर ते पारडी हा रस्ता मंजुरात असून या रस्त्याचे भूमिपूजन सुद्धा करण्यात आले आहे मात्र गेल्या एक वर्षांपासून या मंजूर झालेल्या रस्त्याचे काम प्रशासनाने अद्याप मार्गी लावले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.
तालुक्याच्या प्रत्येक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते असून या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र देखभालीअभावी तालुक्यातील बऱ्याच पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावातील पादंण रस्ते शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अजुन प्रयत्न झाले नाही, मात्र राळेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी आम्ही विकास केला, आम्ही विकास केला म्हणून बोबलतानी दिसत आहे,शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. पाण्याच्या डबक्यातून शेतकºयांना वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात पांदण रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदण रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मुधापुर येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







