ना वाहन ना फॉगिंग मशीन साडेसहा लाखांचे बिल?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती महानगरपालिका : प्रशासनाच्या नोंदी निविदा अन् कार्यारंभ आदेश नाहीत. तरीही अमरावती शहरात वाहनांद्वारे फॉगिंग मशीनने धुवारणी करण्यात आली, असा दावा एका पत्राद्वारे करण्यात आला असून तब्बल साडेसहा लाखांचे देयक अदा करण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

मनपाकडे सादर पत्रानुसार यंदा १३ जुलै ते १७ ऑगस्टदरम्यान शहरात प्रभाग क्रमांक १ ते २३ मध्ये वाहनांद्वारे फॉगिंग मशीनने फवारणी, धुवारणी करण्यात आली. एक महिन्याचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. परंतु, १८ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबर या कालावधीत त्या कंत्राटदाराला काम करण्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाही. मात्र, वाहनांद्वारे फवारणी, धुवारणीबाबत देयकांची फाइल प्रशासनात अधिकारी स्तरावर फिरवली जात आहे.

वाहनांद्वारे धुवारणीचे देयक काढण्यात आले नाही. यातील वास्तविकता तपासली जात असून त्यानंतर वरिष्ठांच्या निर्णयार्थ ही फाइल पाठविली जाणार आहे. – डॉ. अजय जाधव, स्वच्छता अधिकारी, महानगरपालिका

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013617
error: Content is protected !!