
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर : मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र सुरु असतांना पुन्हा एका शेतकरी पुत्राने विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना दि. १७ ऑक्टोंबर रोज गुरुवारला दुपारी घटना उघडकीस आली.
प्रितम सुरेश सिडाम (32) असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.
प्रितम याने गदाजीबोरी येथील पाणी पुरवठा विहिरीत रात्री उडी मारली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. आज दुपारी एक इसम विहीरी जवळ गेला असता विहिरीत मृतदेह तरगतांना दिसला.
प्रितमने नेमकी कशामुळे आत्महत्या केली याचे कारण अस्पस्ट आहे.त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी व तीन मुले आहेत.परिणामी, तालुक्यात वाढत्या आत्महत्येचे सत्र कायम असून तालुका कमालीचा प्रभावित होत आहे..
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 89







