बत्त्याने वार; वयोवृद्ध पित्याची हत्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

येवदा/दर्यापूर वृद्धापकाळात मुलगा सांभाळ नसल्याची नातेवाइकांमध्ये करीत तक्रार मृत रामकृष्ण करणाऱ्या वयोवृद्ध पित्याला संतापलेल्या मुलाने मध्यरात्री लोखंडी बत्त्याने डोक्यावर अनेक वार करून संपविले. भामोद येथे संपन्न कुटुंबात ही घटना घडली. मंगळवारी पहाटे येवदा पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली.

पोलिस सूत्रांनुसार, रामकृष्ण सदाशिव कात्रे (६०) असे मृताचे, तर अतुल रामकृष्ण कात्रे (४०) मुलाचे नाव आहे. हत्येच्या एक दिवसापूर्वी सोमवारी सकाळी दर्यापूर येथे दोघेही बाप-लेक बँकेत गेले होते. तेथील कामे आटपून दोघेही भामोद येथे सोबतच ते परतले. मध्यरात्रीच्या सुमारास बापलेकातील वादावादीअंती संताप अनावर झालेल्या अतुलने रामकृष्ण यांच्यावर बत्त्याने डोक्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या रामकृष्ण कात्रे यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घरात आरोपी अतुलची पत्नी व मुलगी असे चौघेच घरी होते. मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास माहिती मिळताच येवदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रामकृष्ण कात्रे हे घरात खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. अतुल कात्रे हादेखील घटनास्थळी होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड, ठाणेदार विवेक देशमुख, सहायक उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण, पोलिस कर्मचारी पंकज नळकांडे, शरद सारसे, अनिल भटकर, प्रवीण वानखडे, अमोल केंद्रे, धनंजय डोंगरे, रोशन टवलारे, मुकेश मालोकार, सुनीता चव्हाण, जयश्री लांजेवार यांनी पंचनामा केला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013612
error: Content is protected !!