अखेर मेळघाटात केवलभैय्याचं जमलं भाजपाने केली उमेदवारी घोषित

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

धारणी : मेळघाट विधानसभा मतदार संघ हा महायुतीतील भाजपाला की एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटाला यावर राजकिय तोडगा अखेर निघाला असुन हा मतदार संघ ठरल्याप्रमाणे भाजपाच्या वाट्याला येऊन माजी आमदार केवलराम काळे यांना उमेदवारी घोषित झाल्याने प्रहार पक्षातून शिवसेनेत गेलेले राजकुमार पटेल यांची निराशा झाली असुन पटेल काय निर्णय घेतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळघाट विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याने केवलराम काळे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडू न २०१९ ची निवडणूक लढविली त्यात ते पराभूत झाले होते. २००९ च्या निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून ते आमदार निवडूनआल्यानंतर २०१४ च्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार प्रभुदास भिलावेकर यांना पराभूत केले होते. गेल्या दोन निवडणूकीत सतत पराभूत झालेले केवलराम काळे यांनी राजकिय परिस्थितीला अनुसरुन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपात विधानसभा निवडणूकीची तयारी प्रारंभ केली होती आणी ही पूर्व तयारी पथ्यावर पडली. भाजपा कडून प्रभुदास भिलावेकर, रेखा मावस्कर, ज्योती सोळंके आदि आदि उमेदवार इच्छुक असतांना व आमदार राजकुमार पटेल है महायुतीतील एकनाथ शिंद यांच्या पक्षात गेल्याने हा मतदार संघ कोणाला सुटणार अशी परिस्थिती निर्माण झाली असता केवलराम काळे यांना भाजपाची उमेदवारी घोषित झाल्याने भाजपा पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे ही राजकिय दृष्ट्या महत्वाचे ठरणार आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013606
error: Content is protected !!