‘नाफेड’ खरेदीचा फार्स, सोयाबीन मातीमोल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपासून ४८९२ रुपये हमीभावाने सोयाबीनची शासन खरेदी सुरू झाली असली तरी १९ पैकी १७ केंद्रे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शासनखरेदीचा केवळ फार्स ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ‘एमएसपी ‘पेक्षा एक हजार कमी दराने सोयाबीन विकावे लागत आहे. शासनखरेदीची धूळफेक असल्याने सोयाबीन मातीमोल भावाने विक्री होत आहे.

केंद्र शासनाने ग्वाही दिल्याने यावेळी ९० दिवस शासनखरेदी होणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सोयाबीन, मूग व उडदाची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली व मूग व उडीद १० ऑक्टोबर व सोयाबीन १५ पासून हमीदराने खरेदी करण्यात येणार असल्याचे पत्र आले. त्यानुसार जिल्ह्यात सोयाबीनची नोंदणी सुरू झाली व मूग उडदासाठी प्रतिसाद मिळाला नाही. १५ ऑक्टोबरपासून एकही शासन खरेदी केंद्र सुरू झाले नाही. डीएमओच्या तिवसा व नांदगाव खंडेश्वर येथील केंद्रांवर थोडी खरेदी करण्यात आली. मात्र, व्हीसीएमएफचे एकही केंद्र अद्याप सुरू झालेले नसल्याने खासगी खरेदीत सोयाबीन मातीमोल भावाने विकल्या जात आहे.

 

सोयाबीनमध्ये १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता सध्या सोयाबीनचा हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे २० ते २२ टक्के आर्द्रता असल्याचे कारण पुढे करण्यात आलेले आहे. त्यामुळे व्हीसीएमएफ व डीएमओ या यंत्रणांद्वारा सोयाबीनची शासन खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नाहीत. शासनखरेदीसाठी सोयाबीनमध्ये १२ टक्के आर्द्रता आवश्यक असल्याचे या यंत्रणांद्वारा सांगण्यात आलेले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013608
error: Content is protected !!