३३ केव्ही लोणी टाकळी विद्युत उपकेंद्राला आयएसओ मानांकन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा देण्यासाठी उपकेंद्राचे अत्यंत उत्कृष्टरीत्या सक्षमीकरण आणि नूतनीकरण करण्यात आल्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथील ३३ -११ केव्ही विद्युत उपकेंद्राला आयएसओ ९००१: २०१५ मानांकन मिळाले आहे. आय.एस.ओ. मानांकन मिळणारे हे जिल्ह्यातीलच नव्हे तर अमरावती परिमंडळातील पहिले उपकेंद्र आहे. त्यामुळे परिमंडळासाठी ही बाब आनंददायी असल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले. जिल्ह्यात ग्रामीण

विभागाअंतर्गत लोणी (टाकळी) येथील उपकेंद्रात आयोजित विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंते दिपक देवहाते, दीपाली माडेलवार, सहायक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर, उपविधी अधिकारी, प्रशांत लहाने, उपअभियंता जयंत घाटे उपस्थित होते. आय.एस.ओ. मानकानुसार उपकेंद्रातील उत्कृष्ट कामाचा फायदा वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी होणार आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013608
error: Content is protected !!