
अमरावती : येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. बारावीसाठी बुधवार ३० ऑक्टोबर, तर दहावीसाठी ५ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून हे अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यामुळे सध्या प्रत्येक शाळा, महाविद्यालयात विविध विषयांच्या असाइनमेंटचे अहवाल सादर करण्यासह परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेने स्वतंत्र वेळापत्रक न तयार करून दिले असून, त्यानुसार त्या-त्या शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांनायोग्य त्या सूचना निर्गमित केल्या आहेत. अर्ज भरण्याच्या दोन्ही तारखा विनाविलंब शुल्काशिवायच्या आहेत. परंतु जे विद्यार्थी या वेळेत परीक्षा अर्ज भरू शकणार नाहीत, त्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरून देण्याची मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यक्षेत्रात पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि दहावीच्या सर्व शाळांना मंडळातर्फे योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन भरावयाचे आहेत. या परीक्षेच्या तारखा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







