तिवस्याचा तिढा सुटला, महायुतीची उमेदवारी भाजपचे राजेश वानखडेंना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती- महायुतीने जिल्ह्यातील तिवसा वगळता सर्वच विधानसभा उमेदवारांची नावे घोषित केल्यामुळे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष महायुतीच्या उमेदवाराकडे लागले होते. हा मतदारसंघ भाजपला सुटल्याने तसेच या जागेसाठी तीन दावेदार असल्यामुळे भाजप श्रेष्टींपुढे मोठा पेच निर्माण झाला होता मात्र रविवारी सकाळी भाजप नेतृत्वाने हा तिढा सोडवत राजेश वानखडे यांना उद्या नामांकन अर्ज दाखल करण्याचे थेट आदेश दिले. पक्षाकडून अधिकृत घोषणा होणे बाकी असून सोमवारी महायुतीच्या सर्वच नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महायुतीचे उमेदवार तिवसा विधानसभेसाठी नामांकन दाखल करणार आहेत.

तिवस्यात दुहेरी लढतीचे संकेत जिल्ह्यातील अतिषय महत्वाचा समजला जाणारा तिवसा विधानसभा मतदार संघावर गेल्या पंधरा वर्षांपासुन काँग्रेसच्या ताब्यात आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने राजेश वानखडे हे काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विरोधात उभे होते. मात्र १०३६१ मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यांनी दीड वर्षांपूर्वी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश घेत आपल्या कामांचा धडाका सुरू ठेवला तसेच भाजप मधील जेष्ठ, श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन मतदार संघात जनसंपर्क कायम ठेवला. भाजपचे रविराज देशमुख यांनी सुद्धा गेल्या काही वर्षांपासून मतदार संघात जनसंपर्क कायम ठेवत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवुन तिवसा विधासभेची जय्यत तयारी केली मात्र रविवारी सकाळी पक्षनेतृत्वा राजेश वानखडे यांना उमेदवारी जाहीर करत उद्या नामांकन दाखल करण्याचेआदेश दिले. सोमवारी सकाळी राजेश वानखडे यांच्या नामांकन रॅलीला समर्थ लॉन पंचवटी चौक तिवसा येथून प्रारंभ होईल. यावेळी भाजपा जिलाध्यक्ष खा. डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, शहर जिलाध्यक्ष प्रवीण पोटे, साहेबराव तट्टे, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी यांचेसह भारतीय जनता पार्टी, महायुती मित्रपक्षाचे सर्वच नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी १० वाजता राजेश वानखडे यांच्या नामांकन रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!