महारॅली द्वारे शक्तिप्रदर्शन करीत पप्पू पाटील यांनी दाखल केला नामांकन अर्ज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती (प्रतिनिधी) अंबानगरी अमरावती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या रूपात प्रथमच तगडे आव्हान निर्माण करणारा बालाका उमेदवार रिंगणात उतरविला असून सोमवारी मनसेने ऐतिहासिक अंबा नगरीत विजयाचा शंखनाद करीत परिवर्तनाची हाक दिली. मनसे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांनी सोमवारी महारॅली द्वारे शक्ती प्रदर्शन करीत हजारो अमरावतीकर मतदारांच्या साक्षीने आपला नामांकन अर्ज सादर केला. मनसेच्या या महारैलीने अमरावती नगरी दुमदुमून गेली होती.अमरावती शहरातील गाडगे नगर परिसरातील श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिर येथून सकाळी ११ वाजता मनसेच्या नामांकन महा रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीच्या प्रारंभी उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी उपस्थित हजारो कार्यकत्यांनी एका जल्लोष केला. हजारो मनसे कार्यकर्ते व अमरावतीकरांचा सहभाग असलेल्या महा रॅलीत उपख्या जीमवर स्वार पप्पू पाटील अमरावतीकरांचे आशीर्वाद घेत होते. महारॅली पंचवटी चौकात पोहोचताथ पप्पू पाटील यांनी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर इर्विन चौकातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत महा रॅली तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ झाली.महा रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी तसेच चौका चौकात विविध संस्था संघटनांकडून पामू पाटील यांचे स्वागत करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तब्बल तीन ते चार तास चाललेल्या या महालीचा समारोप तहसील कार्यालयजवळ झाला. यानंतर नातेवाईक, प्रियजनांना, हितचिंतक व ग्राहकांना द्या.दिवाळीच्या शुभेच्छा दिवाली, वसुबारसा, धनोदी, नरकाद लक्ष्मीपुजन, दिपावली पाडा, भाज उमेदवार पप्पू पाटील यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसमवेत उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला नामांकन अर्ज सादर केला. शक्तिप्रदर्शन करीत काढलेल्या महा रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांचा उत्साह व महिला भगिनींमध्ये संचारलेला जल्लोष अवर्णनीय असा होता.

पप्पू पाटील यांच्या नामांकन महा रॅलीमध्ये मनसे कार्यकर्ता पदाधिकारी तसेच सर्वसामान्य अमरावतीकर मतदार हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!