डॉ. नितीन राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल; मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

नागपूर : उत्तर नागपूर मतदार संघातून काँग्रेसचे जेष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मंगळवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ. राऊत यांनी पवित्र दीक्षाभूमी, इंदोरा येथील बुद्ध विहार आणि संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

डॉ. नितीन राऊत यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करीत आज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या पूर्वी संविधान चौक पर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत भव्य अशी शक्तीप्रदर्शन रॅली काढण्यात आली होती. मोठ्या उत्साही वातावरणात आणि ढोल ताशा, डिजेच्या गजरात निघालेल्या या रॅलीत डॉ. राऊत  यांचे खंदे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी संविधान चौकात डॉ. राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!