
पातूर :- पातूर विधानसभेच्या मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने पातूर पोलिसांनी सोमवारी (दि. 28) प्रभावी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी सर्वप्रथम पातूर पोलिस स्टेशन येथून शक्तिप्रदर्शनासाठी रॅली काढण्यात आली होती.
पातूर पोलिस स्टेशन येथून शक्तिप्रदर्शनासाठी रॅली
रॅली ही पोलिस स्टेशन येथून निघून मुजावरपुरा, मोमीनपुरा, गुजरी लाइन, पाटील मंडळी, बाळापूर वेस येथून पुन्हा साळनीपुरा, भगत विटाळ, चिरा चौक, मिलिंदनगर, मुख्य मार्गावरून पोलिस स्टेशन येथे या रॅलीचा समारोप करण्यात
आला. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या शक्तिप्रदर्शनात पातूरचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन तडसे, पीएसआय अभिषेक नवघरे, पीएसआय बंडू मेश्राम, सपोउ अरविंद पवार, बीएसएफ 83 कंपनीचे 42 कर्मचारी उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







