आठ जागांसाठी १६० उमेदवार; ८८ जणांची माघार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी तब्बल १६० उमेदवार रिंगणात कायम आहेत. सोमवारी नामांकन मागे घेण्याच्या दिवशी ८८ जणांनी मैदान सोडले असून, आता उमेदवारांना मतदारांकडे मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदार फिरावे लागणार आहे. तर २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी चालविली आहे.अमरावती, बडनेरा, दर्यापूर, तिवसा,अमरावती, बडनेरा, दर्यापूर, तिवसा,मेळघाट या आठही मतदारसंघांतून महाविकास आघाडी आणि महायुती यांना बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः महायुतीत बंडखोरी होऊ नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्यात आले. तरीही काही मतदारसंघात महायुतीत बंडखोरांची उमेदवारी कायम आहे. मोर्शी, बडनेरा या दोन मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बंडखोरांची डोकेदुखी असणार आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन मागे घेण्याचा अवधी होता, त्यानुसार बंडखोरांची विनवणी करून काहींचे बंड शांत करण्यात पक्ष अथवा उमेदवारांना यश आले. मात्र, काही बंडखोरांनी अभी नहीं तो कभी नहीं’ असे म्हणत उमेदवारी कायम ठेवली आहे. आता या बंडखोर उमेदवारांविरुद्ध राजकीय पक्ष कोणती कारवाई करतात हा येणारा काळच सांगेल. नामांकन माघारी घेण्यामध्ये सर्वाधिक उमेदवार बडनेरात २६, तर सर्वांत कमी १५ उमेदवार मेळघाट मतदारसंघात आहेत. उमेदवारांना प्रचारासाठी अवघे १४ दिवस हाती असल्यामुळे त्यांना वेगवेगळी आयुधे वापरावी लागणार आहेत.

 

अमरावती तिहेरी लढत होणार अमरावती मतदारसंघात महायुतीच्या सुलभा खोडके आणि महाविकास आघाडीचे डॉ. सुनील देशमुख, मनसेचे मंगेश पाटील, तर भाजपचे बंडखोर जगदीश गुप्ता यांच्यासह २२ उमेदवार रिंगणात आहेत. असे असले, तरी अमरावतीत तिहेरी लढत होण्याचे संकेत आहे. शेवटच्या टप्प्यात दुहेरी लहत होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.चिन्ह वाटप होण्यापूर्वीच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

 

 

तिवसा थेट लढत,आमदार कोण?तिवसा मतदारसंघात महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या यशोमती
ठाकूर, तर महायुतीतून भाजपचे राजेश वानखडे यांच्यात थेट लढत होणार आहे. गतवेळी झालेली लढत यंदाही पुन्हा होणार असल्याचे चित्र आहे. एकूण २६ उमेदवार रिंगणात असले तरी यशोमती ठाकूर आणि राजेश वानखडे यांच्यातच दुहेरी लडत होईल, वाकूर यांनी तिवस्याचे तीनदा प्रतिनिधित्व केले आहे. या वेळी चौथ्यांदा आमदारकीसाठी रिंगणात आहेत.

 

मोर्शी चौरंगी लढतीत बाजी कुणाची मौर्शी मतदारसंघातून अजित पवार गटातून आमदार देवेंद्र भुयार,भाजपचे उमेश यावलकर,शरद पवार गटाचे गिरीश कराळे, अपक्ष विक्रम ठाकरे या प्रमुख उमेदवारांसह ११ जण मैदानात शड्डू ठोकून आहेत. देवेंर्दै भुयार आणि उमेश यावलकर हे महायुतीचे उमेदवार असून मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत आहे.मोर्शीत महायुतीत मैत्रीपूर्ण होणार असली तरी चौरंगी लढतीत कोण बाजी मारेल, याकडे नजरा लागल्या आहेत.

 

मेळघाट तिरंगी लढत कौल कुणाला? मेळघाट मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.आमदार राजकुमार पटेल हे प्रहार, भाजपचे केवलराम काळे, काँग्रेसचे डॉ. हेमंत चिमोटे या प्रमुखांसह १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत आदिवासी कुणाच्या बाजूने कौल देतात आणि नवा आमदार म्हणून कोणावर शिक्कामोर्तब करतात, हे यंदा महत्त्वाचे ठरणारे आहे. राजकुमार पटेल यांचा शिंदेसेनेत प्रवेश फिस्कटल्याची चर्चा आताही रंगत आहे.

 

बडनेरा चौरंगी लढत,कुणाची बाजी ? मतदारसंघात महायुतीतून युवा स्वाभिमान पार्टीकडून रवी राणा, महाविकास आघाडीतून उद्धवसेनेचे सुनील खराटे, तर अपक्ष म्हणून प्रीती बंड, तुषार भारतीय या प्रमुख उमेदवारांसह २६ जणांचे अर्ज दाखल असून, ते आमदारकीसाठी नशीब आजमावत आहे. एकंदरीत बडनेराचे राजकीय पातावरण बघता पहिल्या टप्प्यात चौरंगी लडत होईल, असे दिसून येते, यावेळी आ. रवी राणा यांचा चौथ्यांदा विजय लक्षवेधी असेल,

 

धामणगाव रे. तिहेरी सामना लढत जुनीच धामणगाव रेल्वे मतदारसंघातून महायुतीतून भाजपचे प्रताप अडसड आणि महायिकास आघाडीतून काँग्रेसचे प्रा. वीरेंद जगताप यांच्यात परंपरागत सामना रंगणार असल्याचे दिसून येते. पंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्वकर्मासह एकूण २४ उमेदवार रिंगणात आहे. मात्र, येथे तिहेरी सामना रंगणार आहे. धामणगावात चावेळी मतदार भाकरी फिरविण्याच्या तयारीत असून ते २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

 

अचलपूर तिरंगी लढतीत कुणाची सरशी अचलपूर मतदारसंघात यंदा भाजपने प्रवीण तायडे यांना उमेदवारी देऊन वेगळा राजकीय डाव खेळला आहे. तर महाविकास आघाडीतीच काँग्रेसचे बबलू देशमुख, प्रहारचे बच्चू कडू, भाजपचे बंडखोर ठाकूर प्रमदोसिंह गईल या प्रमुख उमेदवारांसह २२ जण मैदानात आहेत. मात्र, बच्चू कडू यांचा पंचवार्षिक आमदारकीचा अश्वमेध रोखण्यासाठी राजकीय पक्षाची रणनीती यशस्वी होते का? हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

 

 

दर्यापूर तिहेरी लढतीत बाजी कुणाची?तिहेरी लढतीत बाजी कुणाची?दर्यापूर मतदारसंघात महायुतीतून शिंदेसेनेचे फैशन अभिजीत अडसूळ, तर महाविकास आघाडीतून उद्व‌यसेनेचे गजानन लवटे, युवा स्वाभिमान पार्टीचे रमेश इंदिले यांच्यासह २६ उमेदवार कायम आहेत. अडसूळ, बुंदिले या माजी दोन आमदारांसह शिवसैनिक असलेले गजानन लवटे यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे या तिहेरी लातीत मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात? हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!