सुधारित पैसेवारीत ५,६६८ गावांवर अन्यायाची भावना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भर पडली. अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत १,५९४ गावात ५० पैशाचे आत सुधारित पैसेवारी विभागीय आयुक्तांद्वारा सोमवारी जाहीर केली. शिवाय ५,६६८ गावात ५० पैशापेक्षा जास्त पैसेवारी दर्शविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे.

पश्चिम विदर्भात जून अखेरपासून सुरू झालेला सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे मूग, उडदाचे मोठे नुकसान झाले. तूर, कपाशी, सोयाबीनची वाढ खुंटली, पीक पिवळे पडले, कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांची सरासरी उत्पादकता कमी आलेली आहे. सोयाबीनचे पीक कापणी होत आहेत. त्यामध्ये उतारा कमी येत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे अमरावती विभागात सुधारित पैसेवारी ५० पैशांच्या आत राहणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात फक्त अकोला जिल्ह्यातील ९०० गावांमध्ये ४७ पैसेवारी जाहीर करण्यात आली.

 

सुधारित पैसेवारीची जिल्हानिहाय स्थिती अमरावती जिल्ह्यात २०१३ गावांमध्ये ५६, यवतमाळ जिल्ह्यात २,०४६ गावात ५४, अकोला जिल्ह्यात ९९० गावांत ४७, बुलडाणा जिल्ह्यात ४८२ गावात ५० चे आत व ९३८ गावांमध्ये ५६, वाशिम जिल्ह्यात १२२ गावांमध्ये ५० चे आत व ६७१ गावांमध्ये ५५ सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आल्याने अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!