आधी चोरला मोबाइल, नंतर केला फ्रॉड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : येथील एका ५९ वर्षीय गृहस्थाचा मोबाईल चोरून त्यातून ऑनलाईन बँकिंग प्रणाली वापरून सुमारे १ लाख ७ हजार रुपये परस्पर काढण्यात आले. ३१ ऑक्टोबरला सकाळी तो प्रकार घडला. याप्रकरणी दत्तविजय पंजाबराव महले (वय ५९, शामनगर, व्हीएमव्ही रोड) यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी ४ नोव्हेंबरला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

महले हे ३१ ऑक्टोबरला सकाळी मोची गल्ली परिसरामध्ये गेले असता त्यांचा मोबाईल चोरीला गेला. त्याबाबत त्यांनी कोतवाली ठाण्यात तक्रारदेखील नोंदविली. दरम्यान, त्यानंतर त्यांनी एटीएममध्ये जाऊन एसबीआयच्या खात्यातील बॅलेन्स तपासले असता त्यांच्या खात्यात ३ लाख ५१ हजार ३७६ रुपये शिल्लक होते. त्यानंतर ते दिवाळीत व्यस्त झाले. दरम्यान, २ नोव्हेंबरला त्यांच्या मुलाने मोची गल्लीतून चोरीला गेलेल्या मोबाईलवर रिंग दिली असता, फोन सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आरोपीने त्या मोबाईलमधील सीमकार्ड काढून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करून ते काढण्याचा प्रयत्न केल्याचेदेखील महले यांना इंटरनेटद्वारे कळले. त्यामुळे महले यांनी एटीएममध्ये जाऊन बॅलेन्स चेक केले असता त्यांच्या खात्यातून १ लाख ७ हजार रुपये ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले. स्थानिक कोतवाली पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!