अमरावतीतून कार चोरली, मलकापुरात विकली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : अमरावतीच्या विद्युतनगर भागातून चोरलेली कार अकोला जिल्ह्यातील मलकापूर गावातील एका गॅरेजमध्ये आढळली. त्या कारसह अन्य एक वाहन देखील त्या गॅरेजमधून जप्त करण्यात आले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. शेख आसीफ शेख रफीक (४२, रा. पातूर, अकोला) व शरद श्याम स्मित (२७, रा, मलकापूर, जि. अकोला) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अमरावतीतून ते वाहन चोरणाऱ्या चोराचा पोलिसांनी शोध चालविला आहे. विद्युतनगर येथील अनंत त्र्यंबक हसुलकर (३८) यांचे एमएच ३१ सीएम ८९४७ ही कार त्यांच्या भाड्याच्या घरासमोरून चोरीला गेली. याप्रकरणी हसुलकर यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी २९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. तपासात चोरीला गेलेली ती कार अकोला जिल्ह्यातील पातूर, मेडशी, सावरखेडा टोलनाक्यावरून पुढे नेण्यात आल्याची माहिती समोर आली.

त्याचवेळी ती कार पातूर येथे राहणाऱ्या शेख आसिफ शेख रफीक याच्याकडे असल्याचे पोलिसांना समजले. त्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी शेख आसिफ याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने ती कार शरद ऑटोमोटिव्ह गॅरेजचा मालक शरद स्मित याच्याकडून २८ हजार रुपयांमध्ये विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शेख आसिफला घेऊन शरद स्मित याचे गॅरेज गाठले. त्याला त्या वाहनाबाबत विचारणा केल्यावर ते ओळखीतील एकाने आपल्या गॅरेजवर विक्रीकरिता ठेवल्याचे त्याने सांगितले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013600
error: Content is protected !!