विधानसभेत लिड द्या, पंस, झेडपीची उमेदवारी घ्या !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे साहजिकच विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बारही उडण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आपली विधानसभा काढून घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या अनेक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातील नगरपालिकेच्या प्रभागांसह जिल्हा, पंचायत समित्यांच्या गट – गणातील इच्छुकांना ‘शब्द’ देऊन आताच बोहल्यावर चढवल्याची चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इच्छुकांसह त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये रंगत आहे.

दुसरीकडे ही निवडणूक आणि त्यामधील रसद आपल्या नेत्यांची असली तरी यातून आपली ‘स्थानिक’ तयारी करून घेण्यासाठी इच्छुकांनी हीच संधी हेरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मागील दोन अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्ता कुणाचीही येवो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच असल्याचे संकेत आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!