महिलेकडून न घेतलेल्या ५०० रुपयांसाठी एसटी महामंडळाच्या वाहकाला धमकी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

दर्यापूर : प्रवासभाड्याच्या १५ रुपयांसाठी महिलेने ५०० रुपये वाहकाला दिले. तिने १५ रुपये दिल्यानंतर ५०० रुपये परत मिळाले. मात्र, त्या ५०० रुपयांसाठी येवद्यात एका व्यक्तीकडून शिवीगाळ करण्यात आली, धमकीही मिळाली. एवढेच नव्हे तर ओढाताणीत एसटीची पायरी लागल्याने वाहक जखमीदेखील झाला. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ नंतर हा घटनाक्रम घडला.

ललितकुमार अशोक चिंचे (३६, रा. दारापूर, ता. दर्यापूर) असे जखमी झालेल्या वाहकाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून येवदा पोलिसांनी नीलेश ऊर्फ गोलू सुभाष मोहोड (रा. इंदिरानगर, येवदा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ललितकुमार चिंचे यांच्या तक्रारीनुसार, तळेगाव श्यामजीपंत (जि. वर्धा) आगाराच्या दर्यापूर मार्गे अकोटला जात असलेल्या बस क्रमांक एमएच ४० वाय ५२७८ चे ते वाहक होते. दर्यापूरयेथून एक महिला येवदा येथे जाण्याकरिता बसमध्ये चढली. प्रवासभाड्याचे १५ रुपये सुटे मागितले तेव्हा येवद्याला देते, असे म्हणत तिने ५०० रुपयांची नोट हाती कोंबली. येवद्याला बस थांबली तेव्हा महिलेने १५ रुपये दिले आणि ती ५०० ची नोट परत घेतली. तथापि, याच वेळी १५ रुपयांचे भाडे ५०० रुपये घेतो काय, असे म्हणत येवद्यातील नीलेश मोहोड याने ललितकुमार यांची कॉलर पकडून त्यांना खाली खेचले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!