मजुरांचे अड्डे ओस, जेवणावळी फुल्ल, मंडप-खुर्थ्यांना डिमांड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

शहराच्या काही ठिकाणी ठिय्यावरून मजुरांना रॅली, सभांसाठी आमंत्रण दिले जाते. दोन वेळचे जेवण व मजुरीसुद्धा त्यांना मिळते.

अमरावती : शहरात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले. प्रचारात रॅली, मेळावे, बैठका व सभांचे सत्र सुरू झाले. बांधकाम मजुरांच्या ठिय्यावर गर्दी कमी झाली आहे. मजूर आता कामावर कमी अन् प्रचारात जास्त दिसत आहेत. मतदारांपर्यंत निवडणुकीत पोहोचण्यासाठी उमेदवारांना बरीचशी कसरत करावी लागते. यामुळे निवडणूक काळात अनेक हातांना काम मिळाले. यामध्ये मंडप व्यावसायिक, केटरिंग, मजुरांचे ठेकेदार, खानावळी, बेरोजगार युवक, महिलांशिवाय मालवाहू-प्रवासी ऑटो यासह विविध प्रकारात कामे उपलब्ध झालेली आहेत. २० नोव्हेंबरला मतदान आहे. तोपर्यंत हमखास रोजगार उपलब्ध आहेत. त्यामुळे कामगार कामावर कमी अन् उमेदवारांच्या प्रचारात जास्त व्यस्त असल्याचे दिसून येते.

आता फिव्हर निवडणुकीचा यंदा दिवाळीपेक्षा निवडणुकीचा ज्वर लोकांमध्ये चांगलाच चढला आहे. सकाळपासून लोकं नवीन कपडे, गळ्यात दुपट्टा घालून, दुचाकीत पेट्रोल भरून घराबाहेर पडत आहेत. राजकीय पक्षाच्या बूथमध्ये दिवसभर ठिय्या देत आहेत.

फेटे, हार, बुकेची मागणी वाढली लक्ष्मीपूजनाला फुलांचे दर किलोला १५० रुपये होते. पण, फुलांचे दर निवडणुकीमुळे अजूनही कमी झाले नाहीत.

 

लोक गेले तरी कुठे?शहराच्या काही ठिकाणी ठिय्यावरून मजुरांना रॅली, सभांसाठी आमंत्रण दिले जाते. दोन वेळचे जेवण व मजुरीसुद्धा त्यांना मिळते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!