मनसेचे पप्पू पाटील यांची प्रचारात आघाडी, उत्तम प्रतिसाद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे नव्हे तर विदर्भाचे लक्ष लागून असलेल्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील लढत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार पप्पू ऊर्फ मंगेश पाटील यांच्या उमेदवारीने अटीतटीची व चुरशीची होत आहे. तीन प्रस्थापित दिग्गज उमेदवारांना शह देण्यासाठी पप्पू पाटील मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. गत दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या ‘राजगर्जना’ सभेनंतर पप्पू पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

ऐतिहासिक अंबानगरी अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी एकवेळ संधी द्या, अशी साद मतदारांना घालत मनसेचे पप्पू ऊर्फ मंगेश पाटील यांनी पदयात्रा, कॉर्नर बैठक, सभा, प्रत्यक्ष घरभेट आदी विविध माध्यमातून प्रचाराला गती दिली आहे. पप्पू पाटील यांनाअमरावतीकर मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान पप्पू पाटील यांचे मातृशक्तीने औक्षण करीत विजयाचा आशीर्वाद देत त्यांना बहुमताने निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मनसेचे उमेदवार पप्पू पाटील यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मनसेचे इंजिन जोरात धावत असल्याचे दिसून येत आहे. समस्या तुमची व उत्तर मनसेचे हे ब्रीदवाक्य घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पप्पू पाटील यांनी अमरावतीत विविध समस्यांना हात घातला असून बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला त्यांनी आपल्या प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. पप्पू पाटील यांनी अमरावतीच्या प्रमुख समस्यांबाबत जी कणखर भूमिका घेतली आहे ती अत्यंत महत्त्वाची असून या समस्यांची जाण असलेला आणि ती सोडविणारा पप्पू पाटील सारखा आमदार आम्हास हवा आहे, अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या आहे.

मतदारांच्या मनातला आवाज बनायचा आहे-पप्पू पाटील अमरावती ही संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व डॉ. पंजाबराव देशमुख तसेच अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शनि पावन झालेली ही भूमी. परंतु आज महाराष्ट्रातल्या या प्रमुख शैक्षणिक व सांस्कृतिक शहराची अवस्था मात्र फार केविलवाणी झालेली आहे. शहरात वाढत्या घाणीचे साम्राज्य, उद्योगाचा अभाव, बेरोजगारी वाढता भ्रष्टाचार, तरुण पिढीला व्यसनाधीन करणारे व्यावसायिक व याला कारणीभूत असणारे अकार्यक्षम राजकीय नेतृत्व. यासाठी बदल व्हावा असे प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणूनच आपल्या मनातला आवाज मला बनण्याची संधी आपन द्यावी, असे आवाहन पप्पू पाटील यांनी मतदारांना केले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!