३,२०० सैनिक करणार ईटीपीबीएसद्वारा मतदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

धामणगाव रेल्वे : जिल्ह्यातील रहिवासी पण सध्या देशाच्या संरक्षणाकरिता सीमेवर कार्यरत असणारे ३ हजार २७९ सैनिक या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ईटीपीबीएस प्रणाली अवलंबली असून जिल्ह्यातील हे सैनिक या प्रणालीद्वारे मतदान करणार आहेत. देशाच्या सीमेवर रक्षण करण्यासाठी देशभरातील युवक लष्करी सेवेत कार्यरत आहे. देशभरात विखुरलेल्या या सैनिकांना विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्ससेबल पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस) प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका सैनिकांपर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ वाचणार आहे. त्यांना ऑनलाइन ईटीपीबीएस पद्धतीने मतदान करण्यासाठी जिल्हा सैनिक अधिकारी यांच्याकडून ही यादी मागविण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३,२७९ सैनिक करणार मतदान आठही विधानसभा मतदारसंघांतील मूळ रहिवासी सैनिकांना त्यांच्या रुजू असलेल्या ठिकाणी ही ईटीपीबीएस पद्धत राबविण्यात येणार आहे. याअनुषंगाने निवडणुक यंत्रणेने आवश्यक तयारी सुरू केली आहे.

 

देशाच्या सीमेवर संरक्षणाकरिता कार्यरत असणाऱ्या सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हा सैनिक अधिकारी कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली आहे. धामणगाव विधानसभा मतदारसंघातील २४७ सैनिक नव्या ऑनलाइन पद्धतीने मतदान करणार आहेत.

– तेजश्री कोरे, निवडणूक निर्णय अधिकारी, धामणगाव मतदारसंघ

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013587
error: Content is protected !!