
अमरावती बडनेरा विधानसभेच्या अपक्ष उमेदवार तथा लोकनेते, माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांच्या परिवर्तन प्रचारयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. मतदारांकडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून जागोजागी स्वागत होत असल्याने जणू विरोधकांची बोलती बंद झाली, असा मतदारांकडून प्रीती बंड यांना प्रतिसाद मिळत आहे.
मंगळवारी स्वामी समर्थ मंदिरापासून परिवर्तन प्रचारयात्रेला सुरुवात करण्यात आली. इंद्रायणी कॉलनी, न्यू प्रभात कॉलनी, चक्रधर नगर, देशपांडे प्लॉट, महावीर नगर, शिवशक्ती नगर, डॉ. आंबेडकर पुतळा, शिवाजीनगर, चवरे नगर, जय नगर, सरोज कॉलनी आदी भागात ‘डोअर द्व डोअर’ प्रचार करून पदयात्रेचा समारोप गणेश नगर येथे झाला. बडनेरा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रीती संजय बंड यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि यंदा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने जिंकतील, असा विश्वास परिवर्तन पदयात्रेदरम्यान नागरिकांनी व्यक्त केला. प्रत्येक प्रभागात परिवर्तन प्रचार पदयात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आपण या निवडणुकीत मतदारसंघात इतिहास घडवू असा आशावाद अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांनी व्यक्त केला.
निर्भय बनो प्रीती बंड चुनो’: ज्ञानेश्वर धाने पाटील बडनेरा मतदार संघातील जनता प्रीती बंड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेली असून ताईच्या विजयात आपला सर्वांचा विजय सामावलेला आहे. पुढील दहा दिवस प्रत्येकाने ‘निर्भय बनो प्रीती बंड चुनो’ यांच्यासाठी द्या. पुढील पाच वर्ष प्रीती बंड या निश्चितच आपली सर्वांची काळजी घेतील. बडनेरा मतदारसंघात प्रीती बंड सारख्या उच्चशिक्षित उच्च विभूषित शिकलेल्या उमेदवाराला संधी दिल्यास त्या संधीचे सोने करेल. मतदारसंघात विकासाचे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. मतदारांनी एकदा विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहन माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







