कष्टकरी व श्रमजीवी वर्गासाठी राबविणार कल्याणकारी योजना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : कष्टकरी व श्रमजीवी वर्गाचे प्रश्न व समस्यांची मला जाणीव आहे. त्यांच्या या प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता मी सदैव कटिबद्ध असून, या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. पुढेही हा लढा सुरूच राहणार असल्याचे वचन अपक्ष उमेदवार तुषार भारतीय यांनी वडरपुरा, पंचशील नगर, कुंभारवाडा येथील नागरिकांसोबत संवाद साधताना दिले.

बडनेरा मतदारसंघातून तुषार भारतीय यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या प्रचाराचा झंझावात मतदारसंघातील प्रत्येक भागात पोहोचत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचाराची धुरा आता युवक-युवतींसह विद्यार्थ्यांनी खांद्यावर घेतली आहे. मतदारसंघातील वडरपुरा, पंचशील नगर, कुंभारवाडा, कल्याण नगर, मोती नगर, किरण नगर, डहाने नगर, मुदलीयार नगर, यशोदा नगर या भागांत तुषार भारतीय यांच्या खांद्याला खांदा लाऊन तरुणाईने प्रचार आरंभिला आहे. शहरातील हा सर्वात जुना भाग असताना, येथील समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थेच आहेत. कष्टकरी व श्रमजीवी वर्गासाठी मूलभूत सुविधांचा देखील वानवा असल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले. यावर प्रकाश टाकत तुषार भारतीय यांनी वडरपुरा, पंचशील नगर, कुंभारवाडा परिसरातील मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे कल्याण नगर, मोती नगर, किरण नगर, डहाने नगर, मुदलीयार नगर, यशोदा नगर या विकसनशील भागातही त्यांची प्रचार पदयात्रा पार पडली. ज्येष्ठ नागरिक, महिलांसोबतच आता विद्यार्थी, नवमतदार व युवकांनी त्यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. मतदारसंघाच्या रोजगाराभिमुख विकासासाठी कोण योग्य आहे, हे ते नागरिकांना समजावून सांगू लागले असून, त्यास प्रतिसाद मिळू लागला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013585
error: Content is protected !!