बडनेरा मतदार संघातील जनसामान्यांच्या आशीर्वादाला तडा जाऊ देणार नाही – रवी राणा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : ज्येष्ठ नागरिक, महिला-भगिनी, युवक यांची आपुलकी आणि जिव्हाळा पाहून अभिभूत झाला आहे. मला खऱ्या अर्थाने आपला जिव्हाळा काम करण्याची ऊर्जा निर्माण करते. आपण दिलेल्या प्रेमाला आणि आशीर्वादाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मतदारसंघातील जास्तीत जास्त जनतेच्या हिताचे, विकासकामे करण्याचे वचन देतो, असा विश्वास महायुतीचे उमेदवार रवी राणा यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.

कलोतीनगरातील धनश्री देवी परिसरात भव्य कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कॉर्नर सभेमध्ये महायुतीचे भाजप, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं आठवले, पिरिपा कवाडे, लहूजी शक्ती सेना, शेतकरी संघटना व राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ नागरिक एकवटले होते, हे विशेष.

पुढे बोलताना आमदार रवी राणा म्हणाले, बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या ४० वर्षांच्या इतिहासात शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून संपूर्ण मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलविला आहे. त्यामुळेच महिला, पुरुष, युवा वर्ग यांच्यासमवेत सर्वांचे आशीर्वाद मिळत असल्याची कबुली त्यांनी दिली. स्वतः लाडक्या बहिणी मैदानात उतरल्या आहेत. लाडक्या भावासाठी घरोघरी प्रचार करीत आहोत. कलोतीनगर परिसराच्या विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी सुद्धा दिल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले.

यावेळी नितीन बोरेकर, जोशी काका, अतकरे काका, हळवे काका, कटरे काका, तोटेवार ताई, संतोषअ रोरा, प्रेमदान भारती, किशोर पिवाल,वाठोडकर काका, मिलिंद कहाळे, आशिष गांवडे, राहुल बजाज, पूजा बोरेकर, हर्षल रेवने, प्रीती बनारसे, राजकुमार राठोड, मनोज बोरेकर, श्रीकांत बोरेकर, अशोक राघोते, मुलताईकर काका, अशोकभाई दोशी, राहुल हळवे, श्यामसुंदर गोहत्रे, राजेंद्र डहाके, दिलीप देशापांडे, सुधीर अरावतकर, धोटे काका, शंकर बनसोड, अरुण माडोळे, अरविंद गुडधे, सुरेंद्र मोहिते, किशोर देशपांडे, सुहास खेळकर, पंकज कापसे, गौरव सव्वालाखे, हर्षल खडवळे, नंदराज यादव, कमलेश बिसेन, राजू मालोकार, अविनाश टवलारे, श्रीकांत मेश्राम, मंदार कुलकर्णी, स्वप्नील अडसड, दीपेश शाहा, कपिल बजाज, विनय सावलानी, स्मिता पुंडसे, पल्लवी घोंगडे, प्रतीक्षा डांगे, कविता केडीया, सारिका रत्काल, मीना वाघमारे, स्वाती फुटाणे, सुनंदा डौल, पूनम पाटील, जया सानप आदी उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013587
error: Content is protected !!