धामणगावच्या ‘आदर्श’ मतदारसंघासाठी धडपडताहेत प्रताप अडसड, गृहभेटी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : अगदी जमिनीवर राहून सामाजिक भान जपत राजकारणात आपला आगळा वेगळा ठसा प्रताप अडसड यांनी निर्माण केला आहे. कुठलाही गर्व किंवा आमदार असण्याचा अविर्भाव त्यांच्यात मागील पाच वर्षात दिसला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो की सर्वसामान्य माणूस त्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. सौजन्यपूर्ण वागणूक, तरुण व्यक्तिमत्त्व आणि विकासाची दृष्टी, अशी प्रताप अडसड यांची इमेज आहे. येत्या काळात धामणगाव रेल्वे मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ म्हणून राज्यात ओळखल्या जावा, यासाठी प्रताप अडसड यांची धडपड आहे.

धामणगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार प्रताप अडसड यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्वच घटक पक्षांतील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे भाजपचे सर्व स्तरांतील पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले आहेत. मतदारसंघातील सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांनी अडसड यांच्या प्रचारासाठी पुढाकार घेतला आहे. आ प्रताप अडसड घरोघरी जात असल्याने गृहभेटीत ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळत असल्याचे चित्र आहे. बुधवारी त्यांनी धामणगाव तालुक्यातील १५ गावात मतदारांच्या गृह भेटी घेतल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद त्यांना मिळाले. यावेळी सर्व सामान्य घटकातील ग्रामस्थ सहभागी झाले होते तर युवक मतदारांचा उत्साह होता.

मतदारसंघाचा अडीच वर्षात झालेल्या विकासपर्व अखंडित ठेवण्यासाठी प्रताप अडसड यांनाच निवडून द्या, असे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना विनंती करीत आहेत. त्यांना पुन्हा विधिमंडळात पाठविण्यासाठी भाजपा महिला आघाडीने कंबर कसली आहे. यावेळी आमदार प्रताप अडसड यांच्या पत्नी कृष्णा अडसड धामणगाव शहरात प्रत्येक घरी जाऊन पुढील पाच वर्षात कोणती विकास कामे करणार, याचा विकासनामा घरोघरी सादर करीत आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013587
error: Content is protected !!