चाकूचा धाक दाखवला अन् १.५२ लाखांचा मोबाइल लुटला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावतीः येथील तिरूमला कॉलनीजवळ थांबवत एका दुचाकीस्वाराला लुटण्यात आले. चाकुच्या धाकावर त्यांच्याकडील १.५२ लाख रुपये किमतीचा मोबाईल हिसकावण्यात आला. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ती घटना घडली. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी १८ नोव्हेंबर रोजी दिनेश गांधी (५०, तिरूमला कॉलनी) यांच्या तक्रारीवरून संशयित श्रेयस उर्फ पप्पी पटेल (२०, तपोवन, नेताजीनगर) याच्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

दिनेश गांधी हे १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास घरून मंगल कार्यालयाकडे दुचाकीने जात होते. त्याचवेळी तिरूमाला कॉलनीजवळ त्यांच्या मुलाचा मित्र असलेला पप्पी पटेल हा दुचाकीहून आला. त्याने गांधी यांना थांबविले. तू क्रिष्णा गांधी का बाप है ना? रूक असे म्हणून त्याने अश्लिल शिवीगाळ केली. तथा चाकुचा धाक दाखवला, चाकुच्या धाकावर आरोपीने त्यांच्याकडील १.५२ लाख रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. पोलिसांत तक्रार केल्यास तुझ्यासह तुझ्या मुलाला जीवाने मारून टाकेन, अशी धमकी देत आरोपीने तेथून पळ काढल्याचे दिनेश गांधी यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपासाला दिशा दिली आहे. आशियाड कॉलनीतील चेनस्नॅचिंगपाठोपाठ ही जबरी चोरी नोंद झाल्याने पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. पुढील तपास ठाणेदार ब्रम्ह गिरी करत असून परिसरातील फुटेज तपासले जात आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013584
error: Content is protected !!