
अंजनगाव सुर्जी येथील बसस्थानकाचे व्यवस्थापन चालते. तब्बल ३२ वर्षांनंतर येथील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या १५ दिवसांपासून पाण्याची व्यवस्था असलेल्या बोअरवेलचा पंप नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे. पिण्याचे पाणी तर नाहीच, स्वच्छतागृहातही पाणी नसल्याने त्याचा वापर बंद झाला आहे.
अंजनगाव बसस्थानकात भंगार गाड्यांचा वापर होत असल्याने गाड्या रस्त्यात ब्रेकडाऊन होण्याचे प्रकार घडत आहेत, शिवाय प्रवाशांच्या सुविधांकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष दिले जात नसून गेल्या चार दिवसांपासून बसस्थानकातील बोअरवेलचा पंप जळाल्याने बंद पडला असून, पुरुष व महिलांचे स्वच्छतागृह पाण्याअभावी बंद करावे लागले. त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. एकीकडे बसस्थानकाच्यानूतनी करणाचे काम जोरात सुरू असून, याच बोअरवेलच्या पाण्याचा वापर बांधकामात होत आहे. पंप बंद पडला तेव्हा कंत्राटदाराने या बोअरवेलमध्ये आपल्या कामापुरते पाणी उपसण्यासाठी छोटी मोटार टाकली. मात्र, स्वच्छतागृहांच्या टाक्यांत पाणी जाईल अशी व्यवस्था मात्र केली नाही. यावर प्रशासनाने काहीही उपाययोजना न करता थेट स्वच्छतागृहांना कुलूप ठोकले.
बोअरवेलमधील पंप जळाल्याने तो दुरुस्तीसाठी बाहेर काढताना पाईप तुटून खाली गाळात पडला. त्यामुळे आता तो बाहेर काढून दुरुस्त करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला सांगितले आहे.
– अभिष बहूळकर, आगार व्यवस्थापक, दर्यापूर
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







